काँग्रेसची मोठी कारवाई; अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी बरखास्त…

Published:

ambernath – काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेतील १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना आणि त्यांच्या प्रभाग प्रमुखांना पक्षातून निलंबित केले आहे.
अंबरनाथमध्ये भाजपसोबत हातमिळवणी केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी बरखास्त केली असून अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले आहे.

यासंदर्भात एक पत्रक जारी करण्यात आले असून, काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे, असे पत्रात म्हटले आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपशी युती केली होती. त्यानंतर काँग्रेसकडून हि कारवाई करण्यात आली.

आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयात कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षस्थितीचा भंग करणारी आहे,’ असं पाटील यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच पाटील यांची ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आपल्या सोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांनासुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे, असा उल्लेख पत्रात आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page