ठाण्यातील काही भागात गुरूवार पासून पाणी नाही…

Published:

thane – ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस व अलनिनो प्रभाव आणि ऑक्टोंबर 2026 पासून मान्सू ने लवकर माघार घेतल्यामु‌ळे शासन निर्णयाप्रमाणे 10 टक्के पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि. 22/10/2026 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते शनिवार दि. 24/10/2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत एकूण 36 तास पाणी पुरवठा बंद राहील.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 36 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

सदर पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page