अंबरनाथ – एका इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बी केबिन रोडवर, राहुल नगर मधील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.