dombivali – नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेत डोंबिवलीतील खर्डीकर क्लासेसचे संचालक अध्यक्ष आणि प्रसिद्ध व्यवसायिक डॉ.सुनील खर्डीकर यांना सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि यशस्वी कारकिर्दीची दखल घेत, चीनचे प्रतिनिधी कीन जाय यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या सोहळ्यात जगभरातील उद्योगपतींनी विदर्भाच्या क्षमतेवर विश्वास दर्शवत लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यामुळे विदर्भाच्या औद्योगिक विकासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे.

दरम्यान, या परिषदेतून होणाऱ्या ऐतिहासिक गुंतवणुकीमुळे येत्या पाच वर्षांत सुमारे पाच लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. रोजगाराच्या या संधीमुळे स्थानिक तरुणांना कामासाठी इतर शहरात जावे लागणार नाही आणि त्यांचे स्थलांतर कायमचे थांबेल. असे मत डॉ.सुनील खर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केले.


