मुंबई महापालिकेत महापौर पदी रितू तावडे, उपमहापौर पदी संजय घाडी…

Published:

mumbai – मुंबईच्या महापौरपदी रितू राजेश तावडे तर उपमहापौरपदी संजय शंकर घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी झाली. या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून, अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम ३७ (१) अन्वये महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ऐतिहासिक महानगरपालिका सभागृहात आज (दिनांक ११ फेब्रुवारी २०२६) विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत म्हणजे शनिवार, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षांकडून रितू राजेश तावडे आणि संजय शंकर घाडी यांचे क्रमश: महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकमेव नामांकन अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रितू तावडे यांची तर उप महापौर पदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामकाज सांभाळले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, महानगरपालिका सचिव  मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होत्या.

विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर श्रीमती रितू तावडे व उप महापौर संजय घाडी यांचे पुष्पगुच्छ प्रदान करुन अभिनंदन केले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page