badlapur – महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरिता विनियम) नियम, 2011, दि.22 मार्च 2011 मधील नियम 5 नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंबंधीत स्कूल बस धोरणानुसार मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात दि.11 फेब्रुवारी 2026 रोजी अवैधरित्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 13 वाहनांवरती मोटर वाहन कायदा 1988 व शालेय स्कूल बस नियमावली 2011 नुसार कारवाई करण्यात आली असून 1.36 लाख इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
या तपासणीमध्ये वाहनांच्या सर्व वैध कागदपत्रांस महाराष्ट्र मोटार वाहन (स्कूल बसकरीता विनियम) नियम, 2011 मध्ये विहित केलेल्या सुरक्षिततेच्या मापदंडाप्रमाणे तपासणी करण्यात आली. मुख्यातः शालेय परवान, विद्यार्थी संख्या, चालकाचे वेध संवर्गातील अनुज्ञप्ती व बॅज, महिला सहवर्ती तपासणी करण्यात आली. ही तपासणी बदलापूर इत्यादी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या शाळांच्या परिसरात करण्यात आली, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.


