mumbai – मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळला आहे. शनिवारी १४ फेब्रुवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली. हा स्लॅब रिक्षासह दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कोसळला. या घटनेत ३ जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेला मेट्रोचे काम सुरू आहे. शनिवारी एल. बी. एस मार्गावरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जवळ मेट्रो 4 चा स्लॅब कोसळला. यामध्ये रिक्षासह दुचाकी आणि चारचाकी गाड्या दबल्या गेल्या.रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो कर्मचारी आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, बचावकार्य सुरु आहे.


