गृहमंत्रालय झेपत नसेल तर राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे…

Published:

पुणे – ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झाली आहे; या गोष्टी गंभीर आहेत, त्यामुळे गृहमंत्रालय झेपत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात घडलेल्या दंगली आणि राऊतांच्या धमकी प्रकरणी सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे. सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे. संजय राऊत हे खासदार आहेत, तसेच देशातले मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान करायला हवी. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page