desh – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, तामिळनाडू, सिक्कीम, ओडिशा, कर्नाटक आणि उत्तराखंड या सहा राज्यांसाठी राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
सिक्कीमचे विद्यमान राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांची केरळच्या राज्यपालपदी, तर केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या, ब्रिज मोहन राम यांची ओडिशाच्या, डॉ. सुधा यादव यांची कर्नाटकच्या, तर डॉ. धल सिंह बिसेन यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या नियुक्त्यांमध्ये काही राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर काही नव्या व्यक्तींना घटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर या नियुक्त्या लागू होतील.


