दादर ते नवी मुंबई विमानतळ एसटी बस सेवा सुरू…

Published:

navi mumbai – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुंबईशी सार्वजनिक वाहतूक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सुरू करण्यात आलेल्या दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेचा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. अटलसेतू मार्गे धावणाऱ्या या बससेवेमुळे दादरहून विमानतळापर्यंत प्रवाशांना थेट, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडण्याच्या दृष्टीने ही बससेवा महत्वाची आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या दादरहून थेट विमानतळापर्यंत सेवा सुरू झाल्याने विमानप्रवाशांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होईल.” विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी एसटीकडून बोरिवली–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या बससेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांना विमानतळाशी जोडण्याच्या दृष्टीने या सेवांचा महत्वपूर्ण उपयोग होणार आहे.

विमानतळापर्यंत सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाकडून आवश्यकतेनुसार आणखी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page