डोंबिवली – गुढीपाडव्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लावण्यात आलेले बॅनर अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवर ठाकरे गटाकडून शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर फाडण्यात आले असल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.