कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने मांडली व्यथा…

Published:

डोंबिवली – कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी फेरीवाले हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर एक रुग्णवाहिका चालकास फेरीवाल्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवली पूर्वेला उघडकीस आली होती. तरीही केडीएमसी फेरीवाल्यांवरती कारवाई का करत नाही? आतपर्यंत फेरीवाले तसेच रस्त्यावर बसून आहेत त्यांना कोणाचेही भय नाही? असे प्रश्न निर्माण होत आहेत?

तसेच अनधिकृत बांधकाम हे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. त्यावरती कारवाई होताना दिसत नाही? तेव्हा लोकसेवक, लोकप्रतिनिधी व केडीएमसी, आयुक्त, अधिकारी अनधिकृत बांधकाम रोखणार का? कल्याण डोंबिवली हा स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त कधी होणार?  अशा अनेक प्रश्नांकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page