पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून, या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी ११०४० मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.
पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. प्रत्येक फेरीत त्यांनी दीड ते दोन हजारांची लीड घेतली. त्यानंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पाच हजारांची लीड घेतली. अखेर 19व्या आणि शेवटच्या फेरीत त्यांनी ११ हजार ४० मतांची आघाडी घेत हेमंत रासने यांना पराभूत केलले. शेवटच्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली.