डोंबिवलीत वाहतूक पोलिसाला मारहाण…

Published:

डोंबिवली – एका वाहतूक पोलिसाला दोन जणांनी मारहाण केल्याची घटना लोढा जंक्शन येथे घडली असून, मारहाण करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. भगवान गोरपेकर व दिपक कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. तर मारहाण करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव मधुकर घुगे असे आहे.

ठाणे शहर वाहतुक शाखा, कोळशेवाडी युनिट येथे मधुकर घुगे पोलीस नाईक या पदावर कार्यरत असून लोढा जंक्शन या ठिकाणी ते वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी लोढा हेवन शिवाजी चौक या दिशेने एक मोटारसायकल येत होती. परंतु मेन रोडची वाहतूक सोडल्यामुळे घुगे यांनी सदर मोटारसायकलस्वारास थांबण्यास सांगितले. पण तो न थांबता घुगे यांना शिवीगाळ करत पुढे निघून गेला.

त्यावेळी घुगे यांनी पुन्हा त्या मोटारसायकलस्वारास आवाज देऊन थांबण्यास सांगितले असता त्या मोटारसायकलस्वाराने त्याची गाडी थांबवून त्याच्या साथीदारासोबत मिळून घुगे यांना पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केली. यात घुगे यांच्या शर्टाची बटणे तसेच सरकारी नेम प्लेट व खांद्यावरील फितीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भगवान गोरपेकर व दिपक कांबळे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page