२६ वर्षांपासून प्रलंबित प्रश्नाला अखेर सामंजस्यातून मार्ग…

Published:

dombivali – गणेश नगर, शिवाजी चौक येथील सरस्वती अपार्टमेंट समोरील रस्त्यात असलेल्या गाळ्याचा प्रश्न गेली तब्बल २६ वर्षे कल्याण न्यायालयात प्रलंबित होता. या प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रश्नावर कोणताही अंतिम तोडगा निघत नव्हता आणि रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्नही कायम होता.

गेली अनेक वर्षे हा प्रश्न मार्गी लागावा आणि परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना होणारा त्रास दूर व्हावा, यासाठी बांधकाम व्यावसायिक प्रदीप जोशी सातत्याने प्रयत्न करत होते. गाळाधारक बाबुलनाथ सत्यनारायण यादव यांच्याशी सातत्याने संवाद साधून आपसातील सामंजस्यातून हा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अखेर या प्रयत्नांना यश आले. आणि रस्त्यातील गाळा रिकामा करण्यात आला आणि तो पाडण्यात आला.

हा अडथळा दूर झाल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून रस्ता रुंदीकरणाचा मार्गही सुकर झाला आहे. गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सामंजस्याने मार्गी लागल्याचे प्रदीप जोशी यांना समाधान आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत सहकार्य करणारे बाबुलनाथ यादव तसेच संबंधित सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. नागरिकांची गैरसोय दूर करणे, वाहतूक सुरळीत करणे आणि परिसराचा विकास साधणे हेच माझे सातत्यपूर्ण ध्येय आहे. २६ वर्षांनंतर हा प्रश्न मार्गी लागून रस्ता मोकळा झाल्याचा मला मनापासून आनंद आहे.

श्री. प्रदीप महादू जोशी…

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page