mumbai – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर रितू तावडे यांनी ही घोषणा केली.

पालघर येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने इतर मागास वर्ग प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर हे पद रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्याच्या नगरविकास विभागाने शुक्रवारीच जारी केली होती. त्यानुसार, महापौरांकडून औपचारिकता पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पुढील ६ वर्ष विशाखा राऊत यांना आता निवडणूक लढवता येणार नाही.
विशाखा राऊत या दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 मधून ओबीसी महिला राखीव जागेवर निवडून आल्या होत्या. या जागेवर अत्यंत्य चुरशीची लढाई झाली होती. त्यांनी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा पराभव केला होता..


