dombivali – डोंबिवली शहरात डोंबिवली उपविभाग वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांचे अधिकारी, कर्मचारी व वाहतुकीवर कुठलेही नियंत्रण राहिलेलं नाही. डोंबिवली शहरात बस, डंपर, १० चाकी वाहन, मिक्सर, रेतीच्या गाड्या यांसारख्या वाहनांना बंदी असताना सुद्धा शहरात राजरोसपणे अशी अवजड वाहन ये-जा करताना दिसत आहेत.आरटीओची मान्यता न घेता अनेक ठिकाणी अवैधरित्या रिक्षा, टॅक्सी स्टॅन्ड चालू असून, चार ते पाच प्रवासी घेऊन जाताना दिसतात. इंदिरा चौक, आरटीओ ऑफिस समोरून वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षात अवैधरित्या नको तेवढे प्रवासी भरून घेऊन जात आहेत. रेतीच्या गाड्या जाताना दिसतात. शाळेच्या बस, रिक्षा मुलांना कोंबून – कोंबून नेताना दिसत आहे. काळ्या काचेच्या गाड्या बिन्दास्त रस्त्याने जातात. परंतु यावर कारवाई केली जात नाही.
त्यामुळे डोंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. डोंबिवली शहरातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, श्रीराम पाटील यांचे याकडे लक्षच नाहीये, सर्व कारभार वार्डन बघत आहेत. तर मग श्रीराम पाटील यांची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
हे वार्डन नाहक त्रास देतात तसेच काही लोकांच्या गाड्या अडवून तुझ्याकडे हे कागदपत्र नाही, ते कागदपत्र नाही, पीयूसी नाही अशी कारण देऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणतात आणि चिटपूंजी घेऊन त्यांना सोडतात हि सर्व माहिती श्रीराम पाटील यांना माहिती असूनही ते दुर्लक्ष का करतात? कि यांचाच हे करण्यासाठी हातभार आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.
केडीएमसीने वार्डनची नियुक्ती वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी केली आहे कि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य माणसांना त्रास देण्यासाठी केली आहे. अवजड वाहनांवर केवळ कारवाई केल्याचा दिखावा करतात. आणि त्यानंतर परिस्थिती जैसे थे च असते सर्रासपणे हि अवजड वाहने डोंबिवली शहरात ये-जा करत असतात. या वाहनांमुळे कित्येकदा अपघात होऊन अनेकांचे जीव गेलेले आहेत. तरीही हि अवजड वाहन बंदी असताना शहरात येतातच कशी? अधिकारी, कर्मचारी काय करत आहेत? त्यांचे याकडे लक्ष आहे कि केवळ गाडीवर फाईन मारलं कि कर्तव्य झालं.
दरम्यान, अवजड वाहनांमुळे अपघात झाला तर याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकारी श्रीराम पाटील याची जबादारी घेणार का? तसेच केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल किंवा संबंधित विभागाचे अधिकारी यांचे वॉर्डन कडे लक्ष आहे का?
( डोंबिवली शहरात रेती, डम्पर, रिक्षा, टॅक्सी अन्य इतरांशी लागेबंध असलेल्या वार्डनची नाव माहिती घेऊन पुढील बातमीत प्रसारित करण्यात येणार आहे.)


