भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले…

Published:

pune – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध श्री.क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी (दि. १५) पासून भाविकांसाठी पुन्हा एकदा दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

मंदिर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, गर्दीचे नियंत्रण आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दर्शनासाठी काही नवीन नियमावली जाहीर केली आहे.

नियमावली…

मर्यादित प्रवेश – मंदिरात आता दररोज केवळ १,००० भाविकांनाच प्रवेश दिला जाईल.

पास आणि ओळखपत्र अनिवार्य – दर्शनासाठी ऑनलाईन पास आणि वैध ओळखपत्र (ID Proof) सोबत ठेवणे सक्तीचे करण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) ऑनलाईन नोंदणी करून भाविकांना हा पास मिळवता येईल.

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन सभामंडप आणि पायरी मार्गाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले होते. या कामासाठी सामान्यतः १ वर्षाचा कालावधी लागणार होता, परंतु भीमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या रात्रंदिवस अखंड सहकार्यामुळे हे भव्य काम केवळ ५ महिन्यांत पूर्ण झाले आहे.

दरम्यान, सध्या केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात असल्याने विनानोंदणी भाविकांनी मंदिरात येऊ नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page