चेन स्नॅचिंग करणारे गजाआड…

Published:

dombivali – चेन स्नॅचिंग करणाऱ्या ६ अल्पवयीन मुलांना विष्णुनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन ३ जणांना अटक केली आहे. चिंतन सुनिल नंदा, मोहित सुनिल जाधव, स्वप्नील सुनील भोईर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुगंध म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारत असताना त्यांच्या गळ्यातील २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरीने चोरून नेली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. सदर तक्ररीच्या अनुषंगाने पोलिसांनी नोंद क्रमांक १६२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि त्यानुषंगाने तपास सुरु केला.

तपासादरम्यान, पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने चिंतन नंदा, मोहित जाधव आणि त्याच्यासह इतर ५ अल्पवयीन मुलांनी मिळून गुन्हा करण्यापूर्वी गुन्ह्याची योजना आखून त्यानंतर मोटार सायकलवरून रेकी करून सदरचा गुन्हा केल्याचे व गुन्हयातील जबरी चोरी केलेली सोन्याची चेन ही स्वप्नील भोईरच्या मार्फत विक्री केल्याचे सांगीतले.

सदर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिंतन सुनिल नंदा, मोहित सुनिल जाधव, स्वप्नील सुनील भोईर यांना अटक करून, ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळ, भिवंडी येथे हजर केले. तसेच आरोपींकडून जबरी चोरी केलेली २५.२८० ग्रॅम वजनाची १,०००००/-रू. किंमतीची सोन्याची चेन, आरोपिंनी गुन्हा करताना वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त केल्या.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page