new delhi – नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने नीट-युजी 2026 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली असून, ही परीक्षा 21 जून 2026 रोजी घेतली जाणार आहे.
3 मे रोजी झालेल्या नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर नीटची परीक्षा रद्द करण्यात आली होती. रद्द करण्यात आलेली नीटच्या पुर्नरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
एनटीएने एक्सवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. केंद्र सरकारच्या मंजुरीनुसार, नीट यूजी 2026 परीक्षा पुन्हा घेण्यासाठी तारीख जाहीर करत आहोत. परीक्षा 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थी आणि उमेदवारांना विनंती आहे की, त्यांनी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवावा. असे एनटीएने म्हंटले आहे.


