Jalna – ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकली असल्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हि शाई आणि सुपारी फेकली असून, याप्रकरणी पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विशाल कॉर्नर चौफुलीवर हि घटना घडली. गुणरत्न सदावर्ते हे एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या कुटुंबीयांसह वाहनानं जालना शहराकडे परत येत होते. त्यावेळी विशाल कॉर्नर चौफुली परिसरात काही मनसे पदाधिकार्यांनी त्यांच्या वाहनाला अडवत जोरदार घोषणाबाजी केली आणि अचानक गाडीवर शाई फेक केली. सुपाऱ्याही फेकल्या त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि शाई फेक करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.


