pune – एका ४ वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडली आहे. भीमराव कांबळे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर मुलगी सुट्ट्यांसाठी आजीकडे आली होती. घरासमोर खेळत असताना कांबळे याने तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून केला आणि मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला.
मुलगी बराचवेळ न दिसल्यानं तिची शोधाशोध केल्यानंतर ती गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर कांबळे या मुलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.


