kalyan – सराईत वाहन चोरास कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण १० मोटारसायकल जप्त केल्या. शुभम उर्फ शिवम संपत पठारे असे याचे नाव आहे. तसेच त्याच्यासोबत एका विधीसंघर्षित बालकास देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर, रॉयल रेसिडेन्सी जवळ दोन इसम उभ्या करून ठेवलेल्या गाडयांची पाहणी करत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन शुभम आणि विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले.
तसेच शुभमकडून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली एक मोटारसायकल जप्त करण्यात आली तसेच शुभम उर्फ शिवम संपत पठारे यास अटक करून, त्याच्याकडे केलेल्या तपासात एकूण ३,५५,०००/- रू.कि.च्या १० मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत.
सदरची वाहने विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक, उल्हासनगर येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून, मोटारसायकल चोरीचे एकूण ८ गुन्हे उघड करण्यात आले आहेत.


