महाराष्ट्र न्यूज चा ‘कर्तव्य जननी’ सन्मान सोहळा उत्सहात संपन्न….

Published:

महाराष्ट्र न्यूज आयोजित कर्तव्य जननी सन्मान सोहळा उत्सहात संपन्न झाला. जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्र न्यूज च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील आंनद भवन येथे करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या ( शिक्षिका, ऍडव्होकेट, गृहिणी, नगरसेविका, साहित्य, सामाजिक कार्यकर्त्या, बस वाहक, सफाई कर्मचारी, पोलीस ) जवळपास ५० महिलांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह , सन्मानपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. हर्षाली विजय चौधरी – थविल ( महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ), ऍड.प्रकाश जगताप ( अध्यक्ष, कल्याण फौजदारी वकील संघटना, कल्याण ) उपस्थित होते. तसेच अमृता पाटणकर ( संपादिका महाराष्ट्र न्यूज ) यादेखील उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून, दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता पाटणकर यांनी करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ऍड. हर्षाली विजय चौधरी – थविल आणि ऍड. प्रकाश जगताप यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात ऍड. हर्षाली विजय चौधरी – थविल यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सत्कारमूर्ती कर्तव्य जननी यांचे अभिनंदन केले. तसेच पत्रकार हा देखील समाजाचा एक महत्त्वाचा भाग असल्याचे नमूद केले.

ऍड.प्रकाश जगताप यांनी देखील सत्कारमूर्ती कर्तव्य जननी यांचे अभिनंदन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच जगताप यांनी आपल्या भाषणात सद्याच्या समाजातील विविध परिस्थितीवर प्रकाश टाकला. आजकाल एकत्र कुटुंब पद्धत, लहान मुलांचा मोबाईलचा वाढता वापर तसेच घटस्फोटाचे वाढते परिणाम यावर भाष्य केले. लहान मुलांना मोबाईल वापरायला देऊ नका. मोबाईल माहिती देईल पण संस्कार देऊ शकत नाही. तसेच छोट्या छोट्या कारणावरून घटस्फोट घेणे हि एक गंभीर बाब आहे असे देखील त्यांनी म्हंटले.

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाला सुहास शिंदे (क्राईम मागोवा संपादक), दिलीप मगर, लक्ष्मण हजारे, भानुदास गायकवाड, विनोद गिरी, सचिन ससाणे, राम सावंत, अनिल यादव आणि महाराष्ट्र न्यूज टीम, इतर नागरिक उपस्थित होते.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page