गुरुवारी ठाण्यात पाणी नाही…

Published:

thane – ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती हद्दीतील सिद्धेश्वर जलकुंभ येथे नवीन जलवाहिनीचे काम सुरू असल्याने काही भागातील पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे.

सदर कामादरम्यान खोदाई करताना जलकुंभाच्या 600 मिमी व्यासाच्या आउटलेट जलवाहिनीला बाधा येत असल्याने ती जलवाहिनी स्थलांतरित करणे आवश्यक आहे. या कामासाठी गुरूवार दिनांक 12/03/2026 रोजी सकाळी 9.00 ते शुक्रवार दिनांक 13/03/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील सिद्धेश्वर तलाव परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, गणेशवाडी, नितीन कंपनी, पाचपाखाडी, सरोवर दर्शन, चंदनवाडी, हंसनगर, सिंगनगर, खोपट, फ्लॉवर व्हॅली, शेलार पाडा, गोकुळदासवाडी, कोलबाड, गोकुळनगर परिसर तसेच नौपाडा प्रभाग क्षेत्रातील पाचपाखाडी, चंदनवाडी, महापालिका परिसर, चरई, धोबीआळी आदी भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी सदर पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page