पाणीपुरीच्या गाडीवर दिसला साप…

Published:

mumbai – पाणीपुरीच्या गाडीवर चक्क साप दिसला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरीच्या गाडीवर हिरव्या रंगाचा साप आढळला.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक साप दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, या सापाने कोणालाही इजा केली नाही.

दरम्यान, सापाला सुरक्षितरीत्या बाजूला करण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page