कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा…

Published:

mumbai – भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला 27 जून 2025 रोजीचे 5.30 पासून ते 29 जून 2025 रोजचे 11.30 पर्यंत 3.4 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर राज्यात पुढील 24 तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील 24 तासांमध्ये (28 जून 2025 रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात 19 मिमी पाऊस झाला आहे. तर पालघर जिल्ह्यात 16.1, रत्नागिरी जिल्ह्यात 15.2 मिमी, कोल्हापूर 15.2, आणि रायगड जिल्ह्यात 11.9 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 28 जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे 9.9, रायगड 11.9, रत्नागिरी 15.2, सिंधुदुर्ग 19, पालघर 16.1, नाशिक 4.6, धुळे 9.4, नंदुरबार 1.6, जळगाव 1.9, अहिल्यानगर 0.4, पुणे 5.5, सोलापूर ०.१, सातारा ७.१, सांगली ३, कोल्हापूर १५.२, छत्रपती संभाजीनगर ०.३, जालना ०.१, बीड १,धाराशिव ०.१, नांदेड २.१, परभणी ०.६, हिंगोली ०.४, बुलढाणा ०.१, अकोला ०.४, वाशिम ०.२, अमरावती ०.३, यवतमाळ ३.४, वर्धा १.६, नागपूर ८.२, बुलढाणा १६, गोंदिया २२, चंद्रपूर ४.४ आणि गडचिरोली जिल्ह्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page