gujarat- गुजरतमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानी नगर परिसरातील नागरी वस्तीत एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे. प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनला लंडनला जात होतं. या विमानाने आपल्या नियोजित वेळेनुसार अहमदाबादहून उड्डाण घेतले. मात्र टेक ऑफनंतर अवघ्या १० मिनिटाला हे विमान थेट जमिनीवर आदळले आणि जळून खाक झालं. विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या भागात घरे आहेत.
दरम्यान, या विमानात २४२ प्रवासी, २ वैमानिक आणि १० कर्मचारी होते. २४२ पैकी १६९ प्रवासी भारतीय होते, ५३ ब्रिटिश नागरिक होते, १ व्यक्ती कॅनेडियन होता तर ७ लोक पोर्तुगालचे होते.