घरफोडी करणाऱ्यास डोंबिवली पोलिसांनी केली अटक…

Published:

डोंबिवली – घरफोडी करणाऱ्या एका इसमास डोंबिवली पोलिसांनी अटक करून एकूण ६२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. किशन अशोक कारले असे याचे नाव आहे.

फिर्यादी श्रध्दा म्हाप्रळकर यांच्या घरातील ६०,०००/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने व १०,०००/- रु. रोख रक्कम असा एकूण ७०,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घरफोडी करून चोरून नेला असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून डोंबिवली पोलीस ठाण्यात गुरनं. ५१ / २०२३ भा.दं.वि. ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून किशन अशोक कारले यास अटक केली. तसेच त्याच्याकडून  गुन्हयातील ६०,०००/- रुपये किंमतीचे दागिने व २०००/-  रुपये रक्कम असा एकूण ६२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त सुनिल कुराडे, पोनि सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी, पोनि प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि बळवंत भराडे, पोहवा विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक पोहवा सुनिल भणगे, पोहना सचिन भालेराव, पोडवा तुळशीराम लोखंडे, पोना हनुमंत कोळेकर पोअं शिवाजी राठोड, पो. अंनिलेश यांनी केली. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page