API ईश्वर कोकरे यांचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ‘ईश्वर भरोसे’; गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट; नरेश ठक्करांचा आक्षेप…

Published:

dombivali – डोंबिवली राम नगर पोलीस ठाण्याचे API ईश्वर कोकरे यांचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ‘ईश्वर भरोसे आहे. गेले २ वर्ष झाले फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, अजूनही आरोपीस अटक केली नसल्याचा आक्षेप तक्रारदार नरेश ठक्कर यांनी केला आहे. परेश जैन असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात नरेश ठक्कर यांनी राम नगर पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. ईश्वर कोकरे यांच्या निष्क्रियतेविरोधात दिनांक २० मे २०२५ रोजी ठाणे झोन-३ चे उप पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.

डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात परेश जैन यांच्याविरुद्ध २१ एप्रिल २०२३ रोजी एफआयआर क्र. 0142/2023 (कलम 420, 467, 468, 471 भादंवि) गुन्हा दाखल आहे. तरी आजवर कोणतीही ठोस कारवाई मुख्य आरोपी परेश जैन यांच्याविरुद्ध झाली नसल्याची ठक्कर यांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो फरार आहे. पण प्रत्यक्षात, तो कल्याण न्यायालयात विविध प्रकरणांत नियमितपणे हजर राहत आहे, असा ठोस पुरावा माझ्याकडे असल्याचेही ठक्कर सांगत आहेत.

त्यामुळे या संदर्भात ठक्कर यांनी आपल्या तक्रार अर्जात तपास अधिकारी ए.पी.आय. ईश्वर कोकरे यांच्या निष्क्रीय तपासावर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
तसेच याप्रकरणात उप पोलीस आयुक्तांनी व्यक्तिगत लक्ष घालावे, तपास अधिकाऱ्याला मार्गदर्शन करावे आणि आवश्यक असल्यास तपास अधिकारी बदलावा अशी मागणी ठक्कर यांनी ठाणे झोन-३ चे उप पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.

तक्रार अर्जातील महत्वाचे मुद्दे…

आरोपी परेश जैन याच्यावर इतर अनेक खटलेही प्रलंबित आहेत. तो पुढील तारीख ८ जुलै, १७ जुलै, व १९ जुलै २०२५ रोजी कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.

२९ जून २०२४ रोजी आरोपी परेश जैन चा अटक पूर्व जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळला, तरीही पोलिसांनी अटक केली नाही.

तक्रारदाराने दिलेली साक्ष, दस्तऐवज, व सोसायटी सदस्यांची माहिती चौकशीस घेण्याचे टाळण्यात आले आहे.

तक्रारदार ठक्कर यांनी टिप्पणी करताना म्हटले की, “API श्री ईश्वर कोकरे यांचे इन्व्हेस्टिगेशन म्हणजे ‘ईश्वर भरोसे’ चाललेले आहे, ज्यामुळे कायदा व्यवस्थेची थट्टा होते आहे.”

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page