कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमदेवार जाहीर…

Published:

पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत.

चिंचवड येथील पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठ येथील पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हि पोटनिवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page