१२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या!…

Published:

pune – राज्यातील १२ वीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे ५ मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ…

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

sscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page