kalyan – इराणी वस्तीमधून एका महिलेकडून ५८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ खडकपाडा पोलिसांनी हस्तगत करून सदर महिलेला अटक केली आहे. फिजा मनोज इराणी असे या महिलेचे नाव आहे.
खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत आंबिवली परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विकी करणारे पेडलर व पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता पोलीस पथक गस्त घालत होते त्यावेळी ९० फुट रोड, अटाळी कडून आंबिवली कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित महिला आढळून आली. तिची अंगझडती घेतली असता तिच्याजवळ १,१६,०००/- रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) मिळून आल्याने तिला अटक करण्यात आली. तसेच तिच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई पो.नि. सबाजी नाईक कोळसेवाडी पोलीस ठाणे, स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो. उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.हवा.सदाशिव देवरे, पो.शि. अमित शिंदे, पो.शि. राहुल शिंदे, म.पो.शि. सुनिता होडगर, म.पो.शि. भावना भट यांनी केली आहे.