mumbai – आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर हे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, १९९४ च्या बॅचचे अधिकारी असलेले देवेन भारती यांनी यापूर्वी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि अँटी-टेररिझम स्क्वॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे.