solapur – जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे.
आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.