pune – चाकण-शिक्रापुर मार्गावर भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कंटेनरने १० ते १५ वाहनांना उडवले. यात अनेकजण जखमी झाले आहेत. या चालकाला नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
माहितीनुसार, या ट्रक चालकाने सुरुवातीला चाकण शिक्रापूर रस्त्यावर १० ते १५ गाड्यांना ठोकर दिली. चाकणमधील माणिक चौकात त्याने ३ महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी ही पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या कंटेनरने अनेक वाहनांना उडवले.