राज्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार – मुख्यमंत्री…

Published:

mumbai – पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाकडून अनुदानित प्रकल्पामध्ये नाशिक येथील राम – काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील पाण्याखालील सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे. स्वदेश दर्शन २.० अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्या संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टे नोंदणी प्रमाणपत्र, व्यावसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणे, पर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे ही कामे प्राधान्याने करावी.

पर्यटन विभागाच्या कामकाजाकरिता ई ऑफिसचा वापर करावा.पर्यटन विभागाची वेबसाईट अद्यावत करावी.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणे, चॅट बॉट, ऑनलाइन भाषांतर, प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य देणार

पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वने,नगरविकास,ग्रामविकास, महसूल, गृह आणि ऊर्जा यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करणार.

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ज्या स्मारकाकडे पर्यटक आकर्षित होतात ती स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन सल्लागार समिती स्थापन करा.

पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचलनालय विभागाकडून जलद मंजुरी आणि सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.

प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळे, विमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव येथे काम सुरू करणार.

पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही भाग पर्यटनाव्दारे विकसित करणार.

गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करणे, विंटेज कार संग्रहालये विकसित करणे, मार्कंडा, लोणार येथे टेंट सिटी विकसित करणार.

मार्कंडा, लोणार व कळसूबाई येथे फिरते तंबू शहर विकसित करणे, कोकण किनारपट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बिचवर ब्ल्यूबीच मोहीम. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक सारख्या कलाकारांचे सहकार्य घेणार.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page