‘पिंजरा’ फेम प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन!…

Published:

mumbai – मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा ‘पिंजरा’ हा सिनेमा तुफान गाजला होता. ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.

पिंजरा हा त्यांचा गाजलेला चित्रपट होता. तसंच संध्या यांनी झनक झनक पायल बाजे, नवरंग या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचे हावभाव यातून बोलणाऱ्या संध्या यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनात त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. अरे जा हरे नटखट या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशी वेशभुषा करुन नाच करत सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं होतं. अशा हरहुन्नरी अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page