कल्याण – कल्याण परिसरात विक्रीकरीता आणलेला ५.२० लाखांचा गांजा कल्याण गुन्हे शाखेने जप्त करून तीन जणांना अटक केली आहे. गणेश जमखंडी, अमीर शेख, राज पटेल अशी या तिघांची नावे आहेत.
काही इसम मोठया प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाहेर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्याआधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विठ्ठलवाडी स्टेशनबाहेर पुना लिंक रोड परिसरात सापळा रचून सदर तिघांना अटक केली. हे तिघेहीजण श्रीराम चौकात रिक्षामधून उतरून अपर्णा डेअरीकडे येत होते.
या तिघांकडून एकूण २४ किलो ९६२ ग्रॅम वजनाचा ५,२०,०००/- रू किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत जप्त करण्यात आलेला गांजा त्यानीं ओडीसा राज्यातून विकत घेतला आणि तो गांजा कल्याण, उल्हासनगर परिसरात विक्रीकरीता घेऊन आले असल्याची माहिती समोर आली आहे.