dombivali – तडीपार केलेल्या एका नामचीन गुन्हेगाराला कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. अतुल उर्फ कुंदन बाळू अडसूळ असे याचे नाव असून, डोंबिवली पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील पोलीस उपायुक्त परिमंडळ – 3 कल्याण यांनी अतुलला 18 महिन्या करिता हद्दपार (तडीपार) केले आहे.
दरम्यान, अतुल हा डोंबिवली पूर्वेतील त्याच्या घरी पत्नी व मुलीला लपून-छपून भेटायला आलेला आहे. अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून अतुलला अटक करून त्याच्यावर डोंबिवली पोलीस ठाण्यात रजि.नं.0955/2024 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी डोंबिवली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.