pune – पाण्याची टाकी कोसळून मोठी दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरीच्या सदगुरु नगर या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी अंगावर कोसळल्याने ४ ते ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेबर कॅम्प मध्ये राहणाऱ्या कामगारांसाठी बारा फूट उंचीवर पाण्याची टाकी उभारण्यात आली होती. आज सकाळच्या सुमारास काही कामगार पाण्याच्या टाकीखाली अंघोळ करत होते. तेव्हा, हि पाण्याची टाकी कोसळली आणि दुर्घटना घडली.