कारमधून पाच कोटी रुपयांची रक्कम जप्त…

Published:

pune – पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी वाहनातून ५ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी इनोव्हा क्रिस्टा कारमधून ५ कोटींची रक्कम जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार पुण्याहून कोल्हापुरच्या दिशेने जात होती त्यावेळी खेड शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदी दरम्यान, ही कार पकडण्यात आली. या गाडीमध्ये अंदाजे चार ते पाच कोटींची रक्कम असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी या रक्कमेची मोजणी करून रक्कम पुण्यातील ट्रेझरी येथे पाठवण्यात आली असल्याची माहिती आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page