ठाणे – बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलीस रिमांडवर नेत असताना आरोपीने पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला, यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने गाडीमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. याशिवाय आरोपी शिंदे याने आणखी दोन गोळ्या झाडल्या. यानंतर दुसऱ्या एका पोलिसाने स्वसंरक्षणार्थ बंदूक काढून अक्षय शिंदेवर गोळीबार केला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.