मुंबई – मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरील १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली असून, हि निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, सरकारने गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन वेळा मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केली आहे.