mumbai – संपूर्ण महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज भावपूर्ण निरोप दिला जात आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत विसर्जन मिरवणूका निघत आहेत.
लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. पोलीस यंत्रणा देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे.