डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली रेल्वेस्टेशन जवळ दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला असल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी विष्णु नगर पोलिसांनी सदर दोघांना अटक केली आहे. १) विष्णु सुभाष भांडेकर आणि २) आशिष प्रकाशचंद गुप्ता अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील परिसरात अल्पवयीन मुलगी आपल्या मित्रासोबत फिरायला गेली असता, विष्णु आणि आशिष या दोघांनी आम्ही पोलीस आहोत, तुमची आम्हाला चौकशी करायची आहे, असे अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला धमकावून त्यांना खाडी किना-याजवळ जंगलात निर्जनस्थळी नेऊन आळीपाळीने या दोघांनी या मुलीवर बलात्कार केला. तसेच यातील एकाने सदर प्रकार मोबाईलमध्ये चित्रण करुन तू जर हे कोणाला सांगितलेस तर मी तुझी सर्वत्र बदनामी करेन अशी धमकी दिली. आणि या दोघांनी तेथून पळ काढला.
सदर बाबत विष्णू नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर आणि मानपाडा पोलिसांची पाच पथक तयार करण्यात आली आणि तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विष्णु सुभाष भांडेकर आणि आशिष प्रकाशचंद गुप्ता यास डोंबिवली पूर्व व अंबरनाथ येथून अटक केली.
दरम्यान, विष्णु सुभाष भांडेकर हा रेकार्डवरील आरोपी असून त्याच्या विरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदरची यशस्वी कामगिरी अती. पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, परीमंडळ ३ कल्याण, पोलीस उप आयुक्त सुधाकर पाठारे परीमंडळ ४, सहा.पोलीस आयुक्त सुनिल कु-हाडे डोंबिवली विभाग, विष्णुनगर पो.स्टे.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर व मानपाडा पोलीस ठाण्याच्या तपास कामी पाच पथक तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन खंदारे, खिल्लारे, पोउप आंधळे, दिपविजय भवर, मपोउनिरी मोहीनी कपिले. तसेच अंमलदार पोलीस हवालदार भोसले, मोरे, जमादार, पाटिल, मुर्तडक, नागपुरे, घोलप, पोलीस नाईक भोई रायसिंग, पोलीस चालक कमोदकर, तसेच मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी सहा पोलीस निरीक्षक तारमळे, वनवे, पो.हवा खिलारे, स.पो.उप.निरी काटकर, पो. हवा टिकेकर, मासाळ, पवार. पो. ना भोईर, शिरीश पाटिल, घाडगे, कसबे, पवार, पाटील, आहेर, आव्हाड यांनी केली.