पुणे – २५ ऑगस्टला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीच्या बैठकीत २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेच दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली.
एमपीएससी आणि आयबीपीएस या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.