पालघर – पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डहाणू, गांजा, कासा या परिसरामध्ये आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास तीव्र आणि सौम्य असे दोन भूकंपाचे धक्के जाणवले.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती. हे धक्के १० किलोमीटर खाली होते, तर १९.८७ अक्षांश आणि ७२.७६ रेखांश दिशेला या भूकंपाचा केंद्र बिंदू मुंबई, नाशिक आणि गुजरातमधील वापीपासून जवळ होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.