New Delhi – निवडणूक आयोगाकडून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीर आणि हरियाणासाठी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं.
त्यानुसार, जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका घेण्यात येणार आहेत. १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला जम्मू-काश्मिरमध्ये मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत.
हरियाणात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १ ऑक्टोबरला हरियाणात मतदान होईल आणि ४ ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. हरियाणात विधानसभेच्या ९० जागा आहेत.