dombivali – कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सदर बांधकामांवर तोडक कारवाईला पालिकेचे कर्मचारी, अधिकारी टाळाटाळ करतात हा देखील प्रश्न ऐरणीवर आला असून, पालिकेच्या अनेक वार्डमध्ये राजकीय दबाव आणून काम करणारे लोक असून, सदर कर्मचारी मोठ्या राजकीय लोकांच्या संपर्कात असल्याने बिल्डर व पालिकेचे कर्मचारी यांच्यात लागेबंध असल्याचे दिसते.
याचे उदाहरण द्यायचे झाले तर ह प्रभाग क्षेत्र कार्यालयात विवाह नोंदणी विभाग आणि फेरीवाला पथकात कार्यरत असलेले विजय भोईर आणि मेघराज तुफाँगे उर्फ भाऊजी (आरोग्य सफाई कामगार) हे ह प्रभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असून, त्यांची समाज सेवक लक्ष्मण हजारे यांनी माहिती घेतली असता विजय भोईर आणि मेघराज तुफाँगे उर्फ भाऊजी हे दोघे बिल्डरशी लागेबंध करून पालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्यावर दबाव आणून सदर अनधिकृत बांधकामानांना अभय देत असल्याचे दिसते.

या संदर्भात आम्ही पालिका आयुक्त, सामान्य प्रशासन आयुक्त, डोंबिवली उपायुक्त परिमंडळ, २ यांना वेळोवेळी पत्र व्यवहार केला असून, अजूनही कोणत्याही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही. विजय भोईर, मेघराज तुफाँगे सारख्या व्यक्तींवर कारवाई होताना दिसत नाही. तसेच याबाबत काही कारवाईचे संकेत दिसताच नगरसेवक, स्थानिक आमदार विजय भोईर, मेघराज तुफाँगे सारख्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतात किंवा त्यांच्यावर दबाव आणताना दिसत आहेत.
तसेच फ प्रभागातील भोईर वाडी चाळीवर देखील कारवाई करण्यास पालिका अधिकारी चालढकल करताना दिसत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहता सदर केडीएमसी कर्मचारी विजय भोईर, मेघराज तुफाँगे उर्फ भाऊजी आणि अनधिकृत बांधकामांवर, बांधकाम करणाऱ्यावर पालिकेने कारवाई केली नाही तर येणाऱ्या जनता दरबारात या संदर्भात आवाज उठवला जाईल किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाज सेवक लक्ष्मण हजारे यांनी दिलेला आहे.


